

उद्धव गटाचे शहराध्यक्ष अर्जुन भाऊ शिंदे यांची मागणी
सुरगाणा नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक आठ मध्ये सार्वजनिक बांधकामाच्या देखरेखी खाली करण्याचे रस्त्याचे काम चालू आहे.तेथील सर्व रहिवाशांचे म्हणणे की जे काम चालू आहे.ते सर्व पोट ठेकेदाराच्या मर्जीनुसार चालू आहे.तेथील ग्रामस्थांनी विचारपूस केल्यास तेथील पोट ठेकेदार उडवा उडी चे उत्तर देतात आणि ज्या दिवसापासून वार्ड क्रमांक आजच्या कामाची सुरुवात झाली.तेथे कोणत्याच इंजिनीयरने व्हिजिट दिले नाही आणि इस्टिमेटची मागणी केली तर इस्टिमेट न देता उडवडीचे उत्तर देतात.जर काम एस्टिमेटनुसार झाले नाही तर काम बंद करण्यात यावे असे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष अर्जुन शिंदे यांनी सुरगाणा नगरपंचायत चे मुख्य अधिकारी सचिन कुमार पटेल व नगराध्यक्ष भरत वाघमारे यांच्याकडे दिले.जर कामात सुधारणा झाली नाही तर काम बंद करण्यात यावे असे त्यांनी निवेदन दिले.आम्ही काम बंद करून पुढील परिणामास आपण जबाबदार राहील असे निवेदनाद्वारे त्यांनी इशारा दिला.तरी सार्वजनिक विभागाशी संपर्क साधून सर्व कामांचे इस्टिमेट घेऊन सर्व कामांची चौकशी करून इंजिनिअरने पाहणी करून काम व्यवस्थित रित्या करावे असे नगराध्यक्ष भरत व वाघमारे यांनी सांगितले. त्या कामाचे ठेकेदारास काम बंद करण्यास नोटीस देण्याचेही आदेश नगराध्यक्ष भरत वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना दिले.मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल यांनी पण मी स्वतः कामाची पाहणी करून तसेच सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून त्यांच्या कामात सुधारणा करण्यास सांगेल इस्टिमेट नुसार काम करण्यात यावे..
Discussion about this post