- यावल तालुक्यातील कासारखेडा येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : फिरोज तडवी
तालुक्यातील कासारखेडा येथील ५४ वर्षीय इसमाच्या बँक खात्याची लिंक व बंद असलेला मोबाइल क्रमांक लातूर जिल्ह्यातील एकाने सुरू केला. या क्रमांकावर फोन पे सुरू करीत यूपीआयच्या माध्यमातून सदर इसमाच्या स्टेट बँक शाखेतून ७५ हजार रुपये लांबवले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कासारखेडा गावातील रहिवासी राजू निजाम तडवी (५४) यांचे किनगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत खाते आहे. या खात्याला त्यांनी पूर्वी एक मोबाइल क्रमांक लिंक केला होता. . मात्र तो क्रमांक त्यांचा बंद पडला. तेव्हा हा क्रमांक हा भीमराव खंडू काळे (शिरूर, ता.जि. लातूर) यांनी सुरू केला. या क्रमांकावर त्यांनी फोन पे अकाउंट सुरू करून राजू तडवी यांच्या बँक खात्यात असलेले ७५ हजार रुपये परस्पर लांबवले. याची माहिती राजू तडवी यांना मिळताच त्यांनी संबंधित भीमराव काळे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना आपले पैसे परत करण्याची विनंती
आपले पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी टाळाटाळ केली. तडवी यांनी याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.
Discussion about this post