
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण महाराष्ट्र सरकारने तात्काळ मंजूर करावे व सोबतच समाजातील विविध मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधले जावे या मागण्यांसाठी दि.05 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे मांगवीर महामोर्चाचे आयोजन करण्यांत आले आहे. तरी या मोर्चात मातंग समाजासहित आरक्षण लाभ वंचित जाती समूहातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी आज ता.23 रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील सुभेदारी विश्रामगृहात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली. मातंग क्रांती मोर्चाचे अध्यक्ष तथा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक कॉम्रेड गणपत भिसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या आढावा बैठकीत सर्वच सामाजिक संघटनांनी मोठी ताकद लावून मांगवीर महामोर्चात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सामील होण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
या आढावा बैठकीच्या प्रसंगी लहूप्रहारचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पवार, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संदिप मानकर, बहुजन क्रांती मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सुनील मोटे, युवा नेते रवी चांदणे, ऍड.अंगद कानडे, पांडुरंग कसबे, सुभाष मानवतकर, अशोक गायकवाड, महेंद्र तुपे, मनोज कसारे, मारोती क्षीरसागर, राजु कसबे, सूरज चांदणे, साहेबराव गायकवाड, हेमंत पवार, नानासाहेब गायकवाड, योगेश पेटारे, सुनील शेजवळ, मनीष भालेराव, समाधान इच्चे, किशोर कांबळे, एल डी कदम, साहेबराव गायकवाड, सुखदेव घोडे, रोहिदास आस्वार, गणेश तुपे, सुनील जोगदंड, शशिकांत गोफणे, आदींची उपस्थिती होती. बैठकीचे सूत्रसंचालन संदिप मानकर यांनी केले तर प्रास्ताविक संतोष पवार यांनी केले आभार महेंद्र तुपे यांनी मानले !
Discussion about this post