
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा :
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम यांचे मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी कार्यालय,मानोरा यांचे वतीने तालुकास्तरीय कार्यशाळा दिनांक २४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष आशिष पाटील होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक तहसिलदार डॉ.संतोष येवलीकर, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी अजय ढोक उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी रोशन भागवत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर प्रगतशील शेतकरी अजय ढोक यांनी पी .एम.किसान योजनेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर१९ व्या हफ्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखवण्यात आले.
यानंतर तहसीलदार संतोष येवलीकर यांनी उपस्थितांना पी एम किसान याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून सर्वांनी फार्मर आयडी लवकरात लवकर तयार करून घेण्याचे आवाहन केले.
श्उमेश जंगले यांनी योजनेतील तांत्रिक बाबीवर सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष पाटील यांनी उपस्थित सर्व सरपंच व शेतकरी यांना कॅम्प स्वरूपात आपले ग्रामपंचायत स्तरावर फार्मर आयडी तयार करून देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी गणेश जैताडे यांनी केले तर आभार कृषी अधिकारी प्रियंका वालकर यांनी मानले..
Discussion about this post