प्रेस नोट
महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व मासिक ऊस संदेश आयोजित राज्यस्तरीय ” १२ वी ऊस परिषद ” शुक्रवार दिनांक २८/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जनाई गार्डन, पेट, शिराळ रोड, पेठ, ता. वाळवा, जि. सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या परिषद संयोजक समितीचे अध्यक्ष श्री. युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.सदर ऊस परिषदेत महाराष्ट्रातील ऊस शेतीचे आजचे चित्र सर्वांच्या नजरेसमोर आहे. ऊस शेती करणारे शेतकऱ्यांची स्थिती बरीचशी नाजूक झाली असून ऊस शेतीमधील समस्या वाढत आहेत. या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ऊस शेतीतील विचारवंत आणि ऊस शेतीशी पुरक उद्योजकांनी एकत्रित येवून या परिस्थितीवर योग्य चर्चा करून त्याचे कारण शोधून त्याच्यावर ठोस उपाययोजना सुचविण्याची गरज निर्माण झाली असून या गरजेची पुर्तता करण्यासाठीच महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाने राज्यस्तरीय ऊस विकास परिषदेचे आयोजन केलेले आहे. सदर परिषदेचे उद्घाटक मा. श्री. रघुनाथ दादा पाटील (शेतकरी नेते), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. किरणभाऊ चव्हाण (केळी उत्पादक शेतकरी संघ संस्थापक अध्यक्ष) व मुख्य मार्गदर्शक मा. श्री. अतुलनाना माने पाटील (संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ) हे करणार आहेत. सदर ऊस परिषदेत आधुनिक ऊसपिक तंत्रज्ञान विषयाचे मार्गदर्शन करण्यात येणार असून श्री. सुरेश उबाळे ऊस पैदासकार, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र हे ‘ उद्दीष्ट एकरी १०० टनाचे ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, तसेच श्री. शामकांत पाटील साहेब जैन एरिगेशन लि. चे महाराष्ट्र प्रमुख हे ‘ ऊस पीक पाणी व्यवस्थापन ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच मा. महेंद्र घाटगे राज्य तज्ञ संचालक ऊस संघ हे ‘ खत व्यवस्थापन ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच श्री. अनंत निकम
माजी कार्यकारी संचालक साखर कारखाना हे ‘ ऊस विकास योजना राबवणे आज गरज ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सदर ऊस परिषदेस प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. विवेक कुंभार साहेब (जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी सांगली), मा. श्री. नामदेव परीट (जिल्हा कृषी उपसंचालक, कोल्हापूर), मा. श्री. संजय बुवा (कृषी अधिकारी पंचायत समिती वाळवा), मा. श्री. सचिन पाटील (राज्य उपाध्यक्ष ऊस संघ), मा. श्री. अशिष पाटील (राज्य संचालक, ऊस संघ) हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वरील ऊस परिषदेस उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अतुलनाना माने पाटील यांनी केले. यावेळी पत्रकार परिषदेसाठी श्री. समीर शेख, श्री. युवराज पाटील, श्री. अमर पाटील, श्री. महेंद्र घाटगे, श्री. विकास पाटील इ. उपस्थित होते.
आपला विश्वासू,
श्री. युवराज पाटील
अध्यक्ष परिषद संयोजक समिती व
सांगली जिल्हाध्यक्ष
प्रतिनिधी:- नंदकुमार बगाडे पाटील (9822538415)
Discussion about this post