
बार्शी –
येथील शिवाजी महाविद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रम (पॅरामेडिकल) विभागात शिक्षण घेतलेली काजल राजेंद्र मगर रा लऊळ ता. माढा , जि.सोलापुर राज्य पोलीस दलात निवड झाली आहे. प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी काजलच्या या निवडीबद्दल सत्कार केला . पुणे विभागातील पिंपरी चिंचवड गटात काजल म्हणून नुकतीच रुजू झालेली आहे. यावेळी व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख डॉ. दीपक जाधवर, पर्यवेक्षक वायकर, डॉ. सुचेता जवान, प्रा. सोमनाथ पेठकर , प्रा.बळीराम थोरे, प्रा. प्रेमसागर राऊत उपस्थित होते..
Discussion about this post