
अकोट :
(डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी ) रुईखेड ग्रामस्थांचे दैवत श्री बागाजी महाराज यात्रा महोत्सव महाशिवरात्री पासून प्रारंभ होत असून तीन दिवस चालतो. महाशिवरात्रीला सकाळी 11 वाजता पूर्णा नदीवरून जल आणलेल्या कावडदारी भक्तांचे गावात आगमन, संस्थान तर्फे शिवभक्तांचे स्वागत मुख्य मार्गावरून हर बोला महादेवाच्या गजरात मिरवणूक, ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी स्वागत तसेच कावडदारी शिवभक्तांना फराळ व शीतपेय वाटप त्यानंतर संस्थांन च्या प्रांगणात मिरवणुकीचा समारोप सायंकाळी पाच वाजता भिकू भाऊ गावंडे यांच्या निवासस्थानावरून दिंडी पताका सह श्री मूर्तीचे मंदिराकडे प्रस्थान होईल श्री बागाजी महाराजांची मूर्ती विराजमान झाल्यानंतर कावडदरी भक्तांच्या हस्ते विधिवत जलभिषेक करण्यात येईल रात्रीला श्री चा लग्न सोहळा पार पाडण्यात येईल दरम्यान गुरुवार ला सकाळी मंदिरासमोर लहान मुलांचे लोटांगण सायंकाळी पाच वाजता गावातून युवकांचा लोटांगणाचा कार्यक्रम राहील रात्री दहा वाजता पासून ढोलाच्या भजनावर दशावताराची लीला भजनी मंडळी सादर करतील. मध्यरात्रीनंतर श्री मूर्तीची रथावरून शोभेयात्रा निघणार असून शुक्रवारी सकाळी 9वाजता शोभयात्रेचा समारोप होईल दुपारी 12वाजता पासून ढोलाच्या भजनावर अभंगवाणी द्वारे गोपाळकाला सुरुवात होऊन सायंकाळी 5वाजता दहिहंडी कार्यक्रम व त्या नंतर महाप्रसाद वितरण करण्यात येईल. पंचक्रोशीतील भाविकांनी श्री च्या दर्शनाचा व महाप्रसाद चा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे..
Discussion about this post