
महाशिवरात्री निमित्ताने आज सकाळपासूनच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आज सकाळी ईश्वर महादेव मंदिरामध्ये गावकऱ्यांच्या वतीने अभिषेक करण्यात आला आहे.
अतिशय निसर्गरम्य परिसर लाभलेले हे मंदिर असून पुस नदीच्या काठावर हे मंदिर काही दिवसा अगोदरच बांधण्यात आले असून दरवर्षी या मंदिरामध्ये भाविक भक्तांसाठी फराळाचे उत्तम व्यवस्था केलेली असते आणि याचा लाभ गावातील व परिसरातील भाविक भक्त हे दरवर्षीच घेत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंदिरामध्ये दोन क्विंटल उसळीचे आणि तीन क्विंटल रताळाचे भाविक भक्तांसाठी महाप्रसाद म्हणून ईश्वर महादेव मंदिर संस्थानने पुढाकार घेऊन गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील व परिसरातील भाविक भक्त या प्रसादाचा लाभ घेत असून या मंदिराचे अध्यक्ष शेख रजाक शेख मोहम्मद (बाबू शेठ )
हे आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे नावावरून तुम्हाला कळते की हे कोणत्या समाजाचे आहे पण त्यांची भरपूर श्रद्धा आणि भक्ती असल्याकारणाने या ईश्वर महादेव मंदिर संस्थानचे हे अध्यक्ष पदावर असून यातून गावामध्ये किती मोठा एकोपा आहे हे सिद्ध होते आपण बऱ्याच गावांमध्ये समाजा समाजामध्ये भांडणे पाहतो पण त्याही पलीकडे जाऊन हिवरा येथे एक काही वर्षापासून अनोखी पद्धत म्हणजेच एकोप्याची पद्धत सर्व समाजाने एकमेकांशी प्रेमाने राहण्याचा संदेश हिवरावासी देत असून ते अमलात पण आणत असल्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.तसे हिवरा हे गाव नावारुपाला आलेले आहेत कुठल्याही क्षेत्रात सांगा. शिक्षण असो क्रीडा असो सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा राजकारण असो किंवा व्यापार असो याबाबतीत महागाव तालुक्यामध्ये सर्वत्र हिवरा गावचं नाव प्रथमतः येते हे मला आज सांगावसं वाटतंय. या कार्यक्रमाच्या वेळी गावातील भाविक मंडळी व ईश्वर महादेव मंदिर संस्थानचे सर्व सदस्य व मोठ्या संख्येने तरुण वर्ग व बऱ्याच महिलांचा सुद्धा या कामांमध्ये हातभार आपापल्या परीने लावत असताना दिसत होते गावातीलच नव्हे तर परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे..
Discussion about this post