मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तर्फे मराठी राजभाषा मंत्री तथा पालक मंत्री उदय सामंत यांचा पाली येथील निवास स्थानी सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या भेटी दरम्यान अनेक गोष्टींवर चर्चा देखील करण्यात आली.रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी बँक,पोस्ट ऑफिस येथील परप्रांतीय कर्मचारी मराठी भाषे बद्दल दाखवत असलेली अनास्था मंत्री महोदयांच्या नजरेत आणून दिली. तसेच भटक्या श्वानांची व्यवस्था, सागरी संशोधन केंद्र झाडगाव येथे होत असलेल्या अद्यावत मत्स्यालया मुळे संशोधन केंद्राचे होणारे नुकसान अशा अनेक गोष्टी वर सकारात्मक चर्चा देखील करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, मा.तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, वाहतूक सेना जिल्हाचिटणीस रुपेश चव्हाण, महिला आघाडी शहर संघटक बिस्मिल्लाह नदाफ, महिला शहर सचिव संपदा राणा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post