प्रशांत पाटील अहिल्यानगर
अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वारी येथील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या श्री रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी व अभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. साक्षात प्रभू रामचंद्रांनी पुजा करण्यासाठी स्वतःच्या हाताने स्थापन केलेल्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून दर्शन घेण्यासाठी भाविकांनी महाशिवरात्रीच्या पर्वकालावर पहाटे पासून मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली दिसत होती.रामेश्वर मंदीरात दिवसभर भाविक भक्तांची भोलेनाथ महादेवाच्या दर्शनासाठी रीघ लागलेली होती. महाशिवरात्रीच्या सायंकाळी ६ वाजता पहिल्या प्रहर पुजेस सुरूवात झाली.९ वाजता दुसरा, १२ वाजेपासून तिसरा तर पहाटे ३ वाजेपासून ६ वाजेपर्यंत अशाप्रकारे एकुण चार वेगवेगळ्या प्रहरात ब्रम्हवृंदांच्या मुखार्विदातून शास्त्रोक्त पद्धतीने विधीवत पूजा पार पडली जाते. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याच्या किर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होऊन तद्नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.
Discussion about this post