अहिल्यानगर कामगाव नगर तालुका प्रतिनिधि
दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी
महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना सीटू तालुका दौंड जिल्हा पुणे . यांनी सौ सोनाली गारुडी यांना कमी केल्या असल्यामुळे त्यांना परत कामावर घ्यावे .व इतर प्रलंबित मागण्यासाठी गट साधन केंद्र पंचायत समिती दौंड या ठिकाणी राज्य सरचिटणीस कॉम्रेड डॉ अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला . यावेळी तालुका अध्यक्ष सौ सुवर्णा भुजबळ , सचिव सौ शितल टंगल कोषाध्यक्ष सौ विद्या मिसाळ इत्यादी सह दौंड तालुक्यातील शालेय पोषण आहार कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी सौ सोनाली गारुडी यांना परत कामावर घ्या . व प्रलंबित मागण्या साहित आणि 7 मार्च 2025 रोजी आझाद मैदान मुंबई . येथे मोर्चा काढण्यात येणार आहे याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले .
Discussion about this post