शशिकांत तांबे -देवळा प्रतिनिधी –
विंचुर -प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी मार्गावरील भावडबारी घाट ते रामेश्वर फाटा व रामेश्वर फाटा ते गुंजाळ नगर दीड वर्षापासून रखडलेल्या कॉक्रीटीकरण कामाला अखेर अतिरिक्त पोलिस बंदोबस्तात शुक्रवार दिनांक 21 रोजी मुहूर्त निघाला आहे प्रवाशांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे
महामार्गाच्या अर्धवट कामामुळे वाहनधारक व व्यावसायिक त्रस्त झाले होते.यामुळे सतत छोटे मोठे अपघातांना निमंत्रण होते महामार्गाचे तात्काळ काम पुर्ण व्हावे यासाठी वारंवार मागणी होत होती.संबधित शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण बाबत संभ्रम दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी सह राष्ट्रीय महामार्ग अधिकार्यांनी व भुमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन हद्दखुणा निश्चित केल्या असून काही भुधारक शेतकऱ्यांचा संभ्रम कायम असल्याने शेवटी राष्ट्रीय महामार्गने नाशिक येथुन अतिरिक्त पोलिस बंदोबस्तात गुंजाळ नगर ते रामेश्वर फाटा 1.5 किमी दोन्ही बाजूंनी रखडलेल्या कामाला युद्धपातळीवर सुरूवात झाली असून कामास अडथळा निर्माण करणाऱ्यांना गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार आहे.भावडबारीघाट ते रामेश्वर फाटा दुसऱ्या बाजुचे 2.4 किमी रखडलेल्या कॉक्रीटीकरणांचे काम देखील लवकर होणार असून, रखडलेले भावडबारी घाट ते गुंजाळ नगर रस्त्यांचे काम महीनाभरात पुर्ण करणार असल्याचे संबंधित कंपनीने सांगितले असुन त्यानंतर देवळा शहरातील कामाला सुरुवात होणार आहे.
त्याच प्रमाणे भावडबारी घाटातील डोंगरकडेचा भाग काढत आहे लवकरच रस्ता रुंदीकरण काम होणार आहे
Discussion about this post