भोकरदन प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड येथे जुन्या वादातून पेटत्या लोखंडी रॉडने चटके देऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सोनू उर्फ भागवत सुदाम दौंड या आरोपीविरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी कैलास गोविंदा बोराडे (वय ३६, व्यवसाय – शेती, राहणार आ.) हे २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता जागृत वटकेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी भागवत दौंड याने जुन्या वादाच्या कारणावरून निर्दयपणे हल्ला केला.
घटनाक्रम:
🔸 आरोपीने पेटत्या चुलीत लोखंडी रॉड टाकून तो तापवला
🔸 नंतर तो लालबुंद झालेला रॉड फिर्यादीच्या शरीरावर दाबला
🔸 पाय, पोट, पाठ, मानेजवळ, दंड, डावा हात आणि इतर ठिकाणी गंभीर भाजल्या
🔸 हाताने मारहाण करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला
गुन्हा दाखल
या अमानुष प्रकारानंतर फिर्यादीने पारध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार, गुन्हा क्रमांक 40/2025 अंतर्गत IPC 109 (1), 49, 115 (2), 351(2) (3) भारतीय न्याय संहिता-2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपास सुरू
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. नेमाने करत असून, आरोपीवर कठोर कारवाई होणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Discussion about this post