प्रतिनिधी:- बाबाराव मुंडे (9881510722)
नाव- कैलास गोविंद बोऱ्हाडे
गुन्हा- महादेव मंदिरात प्रवेश
शिक्षा- प्रस्थापित जातपंचायतीकडून अंगभर लोंखडी सळी तापवून चटके.
मनोज जरांगेंच्या जालन्यात धनगरांना अशी मनुवादी शिक्षा होते आहे. मौजे अन्वा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना इथे एक घटना घडलीये. महादेवाच्या मंदिरात प्रवेश का केला? म्हणून सळ्या तापवून चटके देण्यात आले. मानेपासून, कंबर, पिंढऱ्यांपर्यंत सळ्यांनी इंच दोन इंच मांस जाळत नेलंय. एक धनगरांचे जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. माऊली सोटच्या अस्थी अजून विझल्या नाहीत. तितक्यात जालन्यात नवा अत्याचार.
मंदिरात प्रवेश खुपतो
ही घटना महाशिवरात्रीला घडली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीचं हे ३०० वं वर्ष आहे. मंदिरात महादेव आणि हिंदोस्थानात हिंदूधर्म टिकवणारी अहिल्यादेवी, त्यांच्या वारसदारांना मंदिरात प्रवेश नाही. धनगरांवर १४ दिवसात ही पाचवी अत्याचाराची घटना आहे. प्रतिकारशुन्य धनगरांना प्रस्थापितांकडून अस्पृश्य वागणूक मिळतीये. अत्याचार सोसण्याची ही सवय आपणास नवदलित बनवते!
ओबीसी आरक्षण लढ्याची पार्श्वभूमी
जालना जिल्हा मनोज जरांगेंमुळे आरक्षण लढ्याचा केंद्रबिंदू बनला. यानंतर इथे धनगर आरक्षण आंदोलकांनी पुढाकार घेतला. दिपक बोऱ्हाडे साहेबांनी धनगर आरक्षणासाठी व ओबीसी आरक्षण बचवासाठी पुढाकार घेतला. याचा राग अनेकांच्या मनात असल्याचे दिसते. बोऱ्हाडे साहेबांनी इथे उपोषणही केले होते. आता ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे ते ही बोऱ्हाडेच. हा जातीवाद धनगरांच्या ओबीसी आरक्षण बचावाच्या क्षमतेचं खच्चीकरण करण्यासाठी आहे का? हा मुळ प्रश्न आहे.

माऊली सोटच्या अस्थि अजून विझायच्या आतच
गेल्या १४ दिवसात धनगरांवरील जातीय हिंसाचाराची पाचवी घटना घडलीये. धनगरांवर जातीय हल्ला झाला की प्रतिकार होत नाही, माऊली सोटच्या अस्थि अजुन विझायच्या आहेत. त्यात ही नवी घटना ढसाळ्यांची कवितेच धनगरांचं वास्तव शोधायला भाग पाडते…..
“आजही मेणबत्तीसारखी जळतात माणसे चौकाचौकातून
कोरभर भाकरी, पसाभर पाण्याचा अट्टाहास केलाच
तर फिरवला जातो नांगर घरादारावरुन
चिंदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यानों
किती दिवस सोसायची ही घोरनाकेबंदी?
मरेपर्यंत रहायचे का असेच युद्धकैदी?”
नवे मनुवादी
हे नवे मनुवादी गाढायला पुढे या. वकील, पोलिस, मिडीयातल्या लोकांनी पुढाकार घ्या. एकीने हा विषय हाताळा पाहिजे. नाहीतर भविष्य भीषण आहे. वेळेत सावध व्हा… या घटना अजून वाढतील. लोंखंडी सळ्या तापवून चटके दिले जात आहेत. उद्या काईलीत तेल उकळवून जिवंत माणसं तळतील. तेव्हाही प्रतिकार झाला नाही तर जातीवाद हात आपल्या उंबऱ्यांपर्यंत पोहचतील. नव्याने लोक मरतील. तेव्हा पुन्हा एखादा धनगर वकील आपला पॉटिकल स्कोअर सेट करायला पुढे येईल. धनगरांवरील हल्लांना, खुनांच्या प्रयत्नांना जातीय हिंसाचार म्हणून पाहू नका असे म्हणेल.….
Discussion about this post