गुरुवारी अनौपचारिक समारोप : जगभरात चर्चा
कोट्यवधी भाविकांनी गजबजलेला महाकुंभमेळ्याचा परिसर समारोपानंतर गुरुवारी असा सुनासुना दिसत होता.
प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभ ही एक ऐतिहासिक ऐतिहासिक घटना ठरली कारण या महाकुंभाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेक नवीन नावे नोंदवली. गुरुवारी महाकुंभाचा अनौपचारिक समारोप झाला आणि या काळात गिनीज वर्ल्ड रेकॉईसची टीम संगमच्या काठावर पोहोचली आणि त्यांनी या अनोख्या कामगिरीची घोषणा केली.
महाकुंभात एकूण ४ नवीन विश्वविक्रम झाले, त्यापैकी 3 विक्रमांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले. १३ जानेवारी रोजी सुरू झालेल्या महाकुंभमेळ्याचा समारोप २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी
- विक्रम १ : ३६० स्वयंसेवकांची चार ठिकाणी गंगा स्वच्छता
- गंगा स्वच्छतेच्या प्रयत्नांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विशेष मोहिमेत ३६० स्वयंसेवकांनी मिळून ४ वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता केली आणि ही मोहीम आता एक नवा विक्रम बनली आहे.
- लाखांहून अधिक तंबू उभारण्यात आले आणि १.५ लाख शौचालये बांधण्यात आली होती.
- ७० हून अधिक देशांतील ५० लाखांहून अधिक विदेशी भक्तांनी प्रयागराजला भेट दिली
शेवटच्या स्नानाने झाला. या विशेष कार्यक्रमाची जगभरात चर्चा होत आहे. हे विशेष आहे कारण जगभरातील लोकांनी यापूर्वी कधीही श्रद्धेचा इतका महासागर पाहिलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी ३ गिनीज वर्ल्ड रेकॉईसचे प्रमाणपत्र सादर केले आणि या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करण्यात आला. (वृत्तसंस्था)
- विक्रम २ : १० हजार लोकांनी एकत्रित रंगविली चित्रे
- सामूहिक चित्र रंगवण्यात एक नवीन विक्रम करण्यात आला. १०,१०२ लोकांनी एकत्रित चित्रे रंगवली. या पूर्वीचा विक्रम ७,६६० लोकांचा होता. तो महाकुंभमध्ये त्याहूनही मोठ्या प्रमाणात तोडण्यात आला.
- ६६.३० कोटीहून अधिक भाविक आले होते.
- ४,००० हेक्टर क्षेत्रात झाला महाकुंभमेळा.
- ७०,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात होते. ४५ दिवसांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १० वेळा दौरा केला.
- १३,०00 ट्रेन चालविण्यात येणार होत्या, मात्र प्रत्यक्षात १६ हजारांहून अधिक ट्रेन चालविण्यात आल्या.
- विक्रम ३: १९ हजार लोकांनी एकाच वेळी झाडून काढले
महाकुंभमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी १९ हजार लोकांनी एकाच वेळी झाडून काढून झाडू अभियान मोहीम पूर्ण केली. यापूर्वी एकाचवेळी १० हजार लोक झाडू अभियानात सहभागी झाले होते.
Discussion about this post