पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य शासनाच्या इतर घरकुल योजनांतर्गत अर्ज करून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून पहिला हफ्ता म्हणून १५,००० रुपये २२ फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आले आहेत.
जर तुम्ही घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि तो मंजूर झाला असेल, तर तुम्हाला पहिला हफ्ता मिळाला आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाइलद्वारे तपासू शकता.
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://rhreporting.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. यानंतर सर्वात शेवटी H फोल्डर आहे त्यामध्ये ‘बेनिफिशियरी डिटेल्स फोर व्हेरिफिकेशन’ यावर क्लिक करावे. आपण आपले राज्य, जिल्हा, तालुका, गाव, घरकुल मंजुरीचे वर्ष व घरकुल योजनेचे नाव निवडून कॅपचा कोड फील करावा व सबमिट या बटनावर क्लिक करावे.
यानंतर आपल्यासमोर डाउनलोड पीडीएफ किंवा डाऊनलोड एक्सेल असे ऑप्शन्स दिसतील त्यापैकी डाऊनलोड पीडीएफ या पर्यायावर क्लिक करून आपण आपले स्टेटस चेक करू शकता.
Discussion about this post