; अन्न आणि औषध प्रशासनाच्या लायसन्स तपासणीने धास्तावले परमिट रूम धारक आणि ट्रेंड विक्रेते
मार्च महिना आला कि विशेष करून महसूल विभाग, महापालिका, किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग आपल्या महसूल वाढीच्या टार्गेट कडे लक्ष द्यायला सुरु करते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाकडे परमिट रम धारक आणि वाईन शॉप धारकांची गर्दी परवाना नूतनीकरणासाठी वाढलेली दिसून येते तर महापालिका प्रशासन आणि महावितरण आपल्या देयकांसाठी नागरिकांकडे तगादा सुरु करतात. मग मार्च एन्डिंग चे कारण समोर येते. मात्र सध्या विशेष करून परमिट रूम धारकांसमोर वेगळीच समस्या उभी राहिली आहे सध्या जिल्ह्यातील काही परमिट रम धारक किंवा वाईन शॉप यांचे परवाने चक्कअन्न औषध प्रशासनाने रद्द केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. सामान्यपणे परमिट रम धारक किंवा वाईन शॉप चालक हे त्यांचे देशी किंवा विदेशी मद्य हे ‘ट्रेंड’ कडून खरेदी करत असतात जिल्ह्यामध्ये विविध ‘ट्रेंड’ चे विक्रेते आहेत मात्र सध्या अन्न आणि औषध प्रशासनाने ट्रेंड विक्रेत्यांना ते ज्या परमिट रम धारक किंवा वाईन शॉप धारकांना विक्री करत असलेल्या मद्या साठी विचित्र अट घालत असल्याचे समोर आले आहे. परमिट रूम धारक याना फूड लायसन्स काढणे आवश्यक आहेच मात्र हा लायसन्स अद्ययावत आणि अन्न व औषध प्रशासनाला सादर करण्याची जाचक अट हि ट्रेंड विक्रेत्यांना घातली असल्याने हे विक्रेतेही हतबल झाले आहेत मुळात परमिट रम आणि वाईन शॉप हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारीतील येतात या संदर्भात या विभागाचे वरिष्ठ अधिकार्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता ते म्हणाले कि असा कोणताही जी आर किंवा नियम सध्या तरी लागू नाही कि अन्न व औषध प्रशासन विभागाने परमिट रम धारकांना फूड लायसन्स च्या तपासणी साठी आपले मद्य विक्री करण्याचे नाही आता सध्या मार्च महिना सुरु आहे आम्ही आमचे टार्गेट परिपूर्ती करत आहोत त्यामुळे ट्रेंड विक्रेत्यांनी किंवा परमिट रूम धारकांनी याबाबत काही तक्रार असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याबाबत एका परमिट रूम धारकाने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले कि अन्न आणि औषध प्रशासनाने आमचे लायसन्स च कॅन्सल केले आहे. हे आम्हाला समजले नाही कि हा अधिकार या विभागाला कोणी दिला.
Discussion about this post