गोंदिया जिल्ह्यातील स्पर्श रिसॉर्ट, तिरोडा येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दलित सेनेची राज्यव्यापी बैठक पार पडली. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील दादा यादव होते.
🔹 महत्त्वाचे निर्णय आणि विषय चर्चा
राज्यभरातील दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष, राज्य कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
🔹 राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सूर्यमणी भिवुगडे यांनी एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक घटकांच्या विकासासाठी सरकारच्या उदासीन धोरणांवर नाराजी व्यक्त केली.
🔹 यंदाच्या बजेटमध्ये वंचित घटकांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याने दलित सेनेने तीव्र निषेध नोंदवला.
🔹 मार्च, एप्रिल, मे दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि मुंबई प्रदेश या भागांमध्ये विभागीय बैठका घेण्याचा निर्णय झाला.



🔥 सुनील यादव यांचा कडाडून इशारा
अध्यक्षीय भाषणात सुनील यादव यांनी समाजविरोधी कार्यक्रमांना थोपवण्यासाठी दलित सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असे मत व्यक्त केले.
📝 उपस्थित मान्यवर
बैठकीस राज फुले, विनोद टिकले, प्रा. संपत वाघमोडे, मुन्ना शेख, प्रदीप नागराळे, शशिकांत शेलार, श्रीकांत सिंगाई, राजेश भोळे, संजय वाघमारे, किसन गव्हाणे, प्रभाकर घेवंदे, प्रशांत लाके, सुरेश तमगाडगे, काळूराम ससाने, राजाभाऊ रणवीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
📢 आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्धार
सदरील बैठकीचे आयोजन गोंदिया जिल्हाध्यक्ष ओंकार बनसोडे यांनी केले, तर सूत्रसंचालन भंडारा जिल्हाध्यक्ष राकेश गजबे यांनी केले.
एडवोकेट विलास तिरपुडे, निकलेश कुमार भोसले, प्रीतम तिरपुडे, विशाल भिवुगडे आणि इतर कार्यकर्तेही या बैठकीला उपस्थित होते.
✊ दलित सेनेने समाजाच्या हक्कांसाठी पुढील काळात मोठे आंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे
Discussion about this post