वडवणी|प्रतिनिधी
वडवणी शहरातील प्रमोद महाजन इंग्लिश स्कूलमध्ये श्रीमती शोभाताई आंधळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमातून मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की,२७ फेब्रुवारी मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, नाटककार,कादंबरीकार, लघुकथाकार,समीक्षक,लेखक ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने प्रमोद महाजन इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवार दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी कविवर्य कुसुमाग्रज तथा प्रसिद्ध लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.महाराष्ट्रातील महापुरुषांच्या- स्त्रियांच्या वेशभूषा,मराठी भाषेतील कविता वाचन,महाराष्ट्रातील संस्कृती दर्शवणारे लोकगीताचे कार्यक्रम तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी मराठी भाषेच्या अनुषंगाने आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा वृद्धिगत होण्यासाठी मदत होईल,भाषेमुळे आपली संस्कृती कळते,मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातील संतांचे तसेच साहित्यिकारांचे मोठे योगदान आहे, आपल्या जीवनामध्ये मराठी भाषा खूप महत्त्वाची आहे असे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून इंग्लिश स्कूल मधील सौ.प्रियांका कुरकुटे,सौ.शितल लाटणे मॅडम,सौ.नितल कुरकुटे मॅडम तशाच सौ.फासे मॅडम,श्रीमती तांबडे मॅडम,श्रीमती बडे मॅडम,सौ.बनसोडे मॅडम,सौ.टकले मॅडम,सौ.केदार मॅडम,सौ.चव्हाण मॅडम,सौ.अबुज मॅडम आदींजनी च्या उपस्थितीमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी इंग्लिश स्कूल मधील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post