यावल प्रतिनिधी फिरोज तडवी
यावल येथील सरस्वती विद्यामंदिर शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थी सन 1992 च्या बॅच विद्यार्थ्यांनी शाळेला मुलांना थंड पाणी पिण्यासाठी नवीन वॉटर कुलर सप्रेम भेट दिला. सरस्वती विद्यामंदिर मधील माजी विद्यार्थ्यांचा नुकताच मेळावा संपन्न झाला यावेळी शहरात व परिसरात राहणारे माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी एकत्र त्यांनी शाळेला भेट म्हणून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी थंड पाणी मिळावे या उद्देशाने शाळेला एक नवीन वॉटर कुलर सप्रेम भेट देण्याचा ठराव करण्यात आलेला होता त्यानुसार शाळेमधील एका छोटेखानी कार्यक्रमात वॉटर कुलर सुप्रीम भेट देण्यात आले यावेळेस शिक्षक एम एम जोशी श्री नंदकिशोर भारुडे भूषण वैद्य माजी शिक्षक एम एम सोनवणे दीपक पाटील यांच्या हस्ते कुलरचे लोकार्पण करण्यात आले यावेळेस माजी विद्यार्थी नितीन सोनार किरण शिंदे सुनील बिरारी साहिल तडवी अतुल भोईटे निलेश पारस्कर वंदना रावते जयश्री यावलकर शैलजा तडवी अण्णा बारीआदी उपस्थित होते

Discussion about this post