वडवणीत हजारोंच्या उपस्थितीत ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला
शिवजयंती समितीचे चोख नियोजन ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी जयंतीला दिली भेट
वडवणी: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वडवणी शहरात भुतो ना भविष्याती साजरी करण्यात आली आहे. यामध्ये विविध कला पथकाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. उंट, घोडे, महापुरुषांची वेशभूषा, सजवलेल्या मेघडंबरी राजमहालात छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती आकर्षक देखावा विविध कला सादर करुन ऐतिहासिक डिजेमुक्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे. या सोहळ्याला मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली होती.
गेल्या आठ दिवसांपासून वडवणी येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सवाची तयारी अगदी जोमाने सुरू होती. शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी वडवणी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरी राजमहाल आकर्षक देखावा सादर करण्यात आला. तसेच कोल्हापूर येथील कलाकारांची प्रसिध्द नादमय ढोल ताशा ध्वजपथकाने ढोल ताशांच्या गजरात मंत्रमुग्ध केले. कोल्हापुर येथील युवक युवतींचे शिवकालीन युध्दकला खेळ पथकाने तलवारबाजी, तरुणांच्या पोटावरील केळी कापणे, तलवारीने लिंबू कापणे, काठी चालवणे, तलवार चालवणे, युद्ध खेळणे, अशा विविध चित्तथरारक कला सादर करून वडवणीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तर धार्मिक कार्यक्रमांमध्ये पारंपारिक वारकरी वेशभूषामध्ये बाल वारकरी भजनी मंडळातील विविध खेळ, टाळ खेळत छत्रपती शिवरायांच्या नामाचा जय घोष केला. महाराष्ट्रातील अकलुज येथील प्रसिध्द हलगी पथक, अलंकार बॅन्जो, उंट, घोड्यावर महापुरुषांची वेशभूषा करत बालकलाकारांनी देखावा सादर करत लक्ष वेधून घेतले होते. भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये महिला व युवक पुरुषांना फेटेधारी महिला मंडळ व फेटेधारी युवक मंडळ, संपूर्ण शहरामध्ये निरनिराळ्या कलरमध्ये फटाक्यांची आतिषबाजी, वडवणी शहरात विद्युत रोषणाई, लेझर शो लाईट यांसह आदी भरगच्च कार्यक्रमांनी भूतो ना भविष्याची अशी डिजेमुक्त जयंती साजरी करण्यात आली आहे. या शोभायात्रेत महिलांसह शिवभक्त हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी वडवणी पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत शांततेत शिवजन्मोत्सव शोभायात्रा पार पाडली. यावेळी, महिला, शिवभक्त, पोलीस, पत्रकार, यांचे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी जयंतीला दिली भेट
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी वडवणी येथील शिवजन्मोत्सवाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पाटील यांच्या भेटीने तरुणात नवे चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी करत घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी छोट्या तालुक्यात देखील विविध कला पथक, आणि सजावट पाहून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शिवजन्मोत्सव समितीचे कौतुक केले आहे.
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
Discussion about this post