परंडा तालुका प्रतिनिधी
बावची विद्यालय,परंडा येथे दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयात भव्य असे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या विज्ञान प्रदर्शनानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बिभिषण रोडगे सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सर्जेराव ठोकळ सर, श्री. बाबासाहेब शिंदे सर, परंडा तालुका क्रीडा संयोजक श्री. सचिन पाटील सर व बावची विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण खैरे सर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने कु. प्रणव कोकाटे, कु. गायत्री कोरे, कु. श्रुष्टी परभणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री बाबासाहेब शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. यानंतर विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक श्री प्रमोद डोके सर, श्री सचिन मोरे सर, कु. पूजा रोडगे मॅडम, श्री शुभम रोडगे सर, श्री संभाजी खैरे सर, श्रीम. पूजा गोडगे मॅडम, यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात सुमारे २६५ प्रयोगात सुमारे ७९५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. श्री शुभम रोडगे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post