प्रतिनिधी:- नंदकुमार बगाडे पाटील (9822538415)
केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा शिवराज सिंह चौहान यांनी 20 लाख घरकुल देण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिले. मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपले महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर जबाबदारी सोपवली. मा जयकुमार भाऊ यांनी 100 दिवसाचे घरकुल योजनेचे उद्दीष्ट पूर्ण करणेसाठी कार्यक्रम जाहीर केला. आणि अवघ्या 45 दिवसात 20 हजार घरकुल मंजूर करण्यात आले.आणि पहिला हप्ता 15000/- रुपये 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले. कराड तालुक्यामध्ये एकूण 4876 घरकुल मंजूर झाले .यासाठी विशेष अभिनंदन कराड पंचायत समिती चे गट विकास अधिकारी मा. प्रताप पाटील साहेब यांचे आहे. मा. गट विकास अधिकारी मा. प्रताप पाटील साहेब यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी कमी वेळात साधारणतः 85% उद्दिष्ट पूर्ण केले. यावेळी नरेगा अंतर्गत रोजगार हमी चे घरकुल साठी साधारणतः 27000/- रक्कम घरकुल साठी मिळते तरी सर्व ग्रामपंचायत ने हा लाभ प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी यांना द्यावा तसेच प्रधानमंत्री शौचालय योजना अंतर्गत 12000/-लाभार्थी ना मिळावे अशी विनंती केली.
यावेळी अजून कोणी लाभार्थी योजनेपासून वंचित असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्व ग्रामपंचायत ना सूचना देण्यात आले आहे असे प्रताप पाटील साहेब यांनी सांगितले. अनेक वर्ष घरकुल पासून वंचित लाभार्थी ना लवकरच त्यांचे हक्काचे घर मिळेल. आणि त्यांची दिवाळी स्वतःच्या घरात साजरी होईल. जिल्हा अध्यक्ष भाजपा मा. धैर्यशील कदम दादा, आ. मनोज घोरपडे दादा, आ. अतुल भोसले बाबा,भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा मा.रामकृष्ण वेताळ साहेब या सर्वांच्या प्रयत्नाने कराड तालुका हा विकासाकडे वाटचाल करत आहे. यांच्या नेतृत्वात सर्व लाभार्थी यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणारच याची खात्री सर्वसामान्य जनतेला आहे. घरकुल योजना कराड तालुक्यात सक्रिय राबवण्यात आली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासकीय समिती अध्यक्ष दिपाली ताई खोत, सरचिटणीस रघुनाथ शेडगे, सरचिटणीस किसान मोर्चा भाजपा पुरंदर जाधव, बूथ अध्यक्ष राजेंद्र लोहार,प्रदीप सावंत, महेंद्र बानुगडे, संजय गिरिगोसावी ,सचिन पुजारी उपस्थित होते.
Discussion about this post