आमदार साहेब हीच का मताधिक्याची परतफेड ? – लक्ष्मण साबळे
प्रतिनिधी:- प्रशांत टेके (8788424309)
कोपरगाव मतदारसंघातील जनतेने लाखोंचे मतदान देऊन एकतर्फी विजय आमदार आशुतोष काळे यांना मिळवून दिला. अद्याप रस्त्यांचा गुलाल देखील पूर्ण पुसला नाही तोच काळे यांनी जनतेला हिसका दाखवला आहे का अशी चर्चा सुरू आहे. आम्ही एक लाख साठ हजारहून अधिक मतदान केले त्याची परतफेड आमच्या दुकाने घर यांच्यावर बुलडोजर चालवून केली आहे का अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण साबळे यांनी व्यक्त केली आहे.कोपरगाव शहराला अतिक्रमण कारवाई झाल्यावर परत सुरळीत होण्यासाठी कित्येक वर्ष निघून जातात.या आधी २०११ ला माजी आमदार अशोकराव काळे यांच्या काळात शहर उजाड झाले होते.मागच्या काळात धोंडेवाडी गाव विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या काळात काय झाले हे आपण पाहिले आहे.काळे कोल्हे हे दोन घराणे इथे वारंवार सत्तेत आहे पण स्व.शंकरराव कोल्हे यांनी वेळप्रसंगी राजकीय किंमत मोजून अशी कारवाई होऊ नये यासाठी भूमिका घेतली होती ती काळे कुटुंबाने आजवर घेतली नाही हे वास्तविक चित्र आहे.एकदा तर जनतेसाठी भूमिका घेतली म्हणून कोल्हे यांना निवडणूक देखील लढवण्याची बंदी आली होती.
नियम दाखवून वरवंटा फिरवणे हा हा जर विकास असेल तर साध्य काय करणार आहात ? मागच्या आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेतले मग हेच आ.आशुतोष काळे यांना का जमले नाही.मागच्या दोन वर्षापूर्वी एकदा स्टँड परिसरात अतिक्रमण उठवले गेले होते तेव्हा आ. काळे म्हणाले होते व्यवस्था करतो पण व्यवस्था फक्त ठेकेदार आणि त्यांच्या जवळच्याची झाली.
सणासुदीच्या तोंडावर २०२५ चे अतिक्रमण कारवाई ही आ.काळे यांच्याच काळात झाली हा योगायोग आहे की दुर्दैव हे कळत नाही.जनतेने भरघोस लीड दिला त्यामुळे ही बक्षिसी दिली आहे का असा प्रश्न पडतो आहे.रस्ते मोकळे करण्याच्या नादात जनतेच्या रोजीरोटीवर हातोडा मारण्याचे काम एकप्रकारे होत आहे कारण रस्ते मोकळे असावे याला दुमत नाही पण जाणून बुजून अगदी दुकानांचे दूरवर असणारे बोर्ड काढण्याचा उद्देश काय होता हे कळू शकले नाही.
चौकट – कोपरगांव शहरात अतिक्रमाणाचे निर्देश फक्त काळे कुटुंबाच्या सत्ता काळातच कसे येतात हा योगायोग आहे, की दुसरेच काही हा प्रश्न पडतो – साबळे
Discussion about this post