पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी )
तुम्हाला पेट्रोल पंप सुरू करायचा आहे का?
इंडियन ऑईल,भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या ऑईल कंपन्यांनी केंद्र सरकारच्या परवानगीने महाराष्ट्रात १६६० नवे पेट्रोल पंप मंजूर केले आहेत. मात्र, या पेट्रोल पंपसाठी आवश्यक असलेली परवानगी रखडल्याचं लक्षात आल्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी’ सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आला आहे.
पंप उभारणीमध्ये इंधन कंपन्यांना महसूल विभागाकडील एनए सह पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध ‘ना हरकत’ परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी’ सुरू करण्यात येईल.
चार हजार कोटींची गुंतवणूक; तीस हजार तरुणांना रोजगार..
केंद्र सरकारने१६६० पंप मंजूर केले. एका अहवालानुसार हे पंप सुरू झाल्यानंतर सुमारे ३० हजारांवर तरुणांना रोजगार मिळेल. राज्यात साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. रोजगानिर्मिती व गुंतवणूक याला प्राधान्य असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
Discussion about this post