प्रा. दिलीप नाईकवाड : सिंदखेडराजा :तालुका प्रतिनिधी
1)राज्यशासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमाची धुळे जिल्ह्यात प्रभावशाली अंमलबजावणी.
2) धुळे जिल्हा नाशिक विभागात प्रथम तर राज्यात चौथा.
3) धुळे जिल्ह्यातील कॉपीमुक्त अभियानाचे शिक्षणमंत्री, मुख्यसचिव, शिक्षण आयुक्त यांच्याकडून कौतुक.
4)धुळे जिल्याचा मान मुख्याधिकारी नरवाडे यांच्या मुळे राज्यात वाढला.
5) धुळे जिल्ह्यातील कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीची राज्यभर चर्चा.
केंद्रात सत्तेवर आल्याबरोबर पहिल्या 100 दिवसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृती आराखडा तयार करून प्रत्येक मंत्रालयाला गतिमान करत उद्दिष्ट ठरवून यंत्रणांना कामाला लावले .त्याच धरतीवर पंतप्रधान मोदींचा आदर्श समोर ठेवून सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रांत
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर राज्य शासनाचा 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून संपूर्ण राज्यातील यंत्रणांना गती देऊन प्रशासन लोकाभिमुख करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी आखला. या आराखड्याची धुळे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिजाऊ माँ साहेबांच्या मातृतीर्थ जिल्याचे भूमिपुत्र आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांनी आराखड्या अंतर्गत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस यांनी दखल घेऊन श्री विशाल नरवाडे यांचा प्रमाणपत्र देऊन
सन्मान केला .बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना त्यांनी महाराष्ट्रातील कॉपीमुक्त अभियान केवळ कागदावरच न ठेवता
कसे राबवावे याचा आदर्शच जिल्ह्यासह महाराष्ट्राला करून दिला. आणि आपली वेगळी ओळखही करून दिली. त्यांच्या कॉपीमुक्त अभियानाच्या पॅटर्नचा धसका जिल्ह्यातील कान्या कोपऱ्यातील परीक्षा केन्द्रावर एवढा घेतला गेला की एखाद्या अधिकाऱ्यानें
प्रामाणिकपणे अभियान राबविण्याचे ठरविल्यानंतर ते किती यशस्वी ठरते याचा आदर्शच मुख्याधिकारी विशाल नरवाडे यांनी समोर ठेवला.
त्यांच्या कॉपीमुक्त अभियानाचा झटका शिक्षण क्षेत्रातील सर्वानांच इतका बसला की त्यांचा धसका घेवून जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी व शिक्षण सम्राटांनी निवडणुकांचे कारण सांगून त्यांची बदली जिल्ह्याबाहेर
केली. हेच कॉपीमुक्त अभियानाचे यश आहे . बदलीनंतरही त्यांनी धुळे जिल्ह्यातही हे अभियान यशस्वी करून दाखवले. त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी कौतूक केले. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी कशी झाली याची आढावा बैठक मुंबई येथे सहयाद्री अतिथीगृह याठिकाणी घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनिक यांचीही उपस्थिती होती. यावेळी राज्यातील 15 विविध विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, महानगरपालीका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदांच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. जिल्हा परिषद गटात सादरीकरणाची संधी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना मिळाली. त्यांनी धुळे जिल्हा परिषदेमध्ये केलेल्या कामाचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले. या सादरीकरणात राज्य शासनाने ठरवून दिलेल्या 7 कलमी कार्यक्रमा बरोबर विभिन्न विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरही श्री.विशाल नरवाडे यांनी केले.
धुळे जिल्हा परिषद संकेतस्थळ तयार करण्यात नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. यामुळे ग्रामीण भागाच्या 7 सेवा ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आल्या आहे.
ग्रामीण भागात राहणीमान सुलभ करण्यासाठी 9 उपक्रम राबविण्यात येत आहेत. कार्यालयीन स्वछता उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेची पंचसुची तयार करण्यात येवून, जुन्या निरुपयोगी वस्तूची विल्हेवाट, तकार निवारण उपक्रमांतर्गत आपले सरकार पोर्टल वरील 349 तक्रारीचे निवारण व निराकरण, अभ्यांगतासाठी भेटीचे नियोजन, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन. कार्यालयीन सोईसुविधा उपक्रमातंर्गत आवारात स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनं, सुसज्ज प्रतीक्षालय, प्रथमोचार पेटी, दिव्यांग अभ्यांगतासाठी व्हीलचेअर, कार्यालयाचे सौंदर्यीकरण, आठवड्यातून २ वेळेस क्षेत्रीय कार्यालयानां भेटी, प्रशासकीय कामात 1 जानेवारीपासून ई-ऑफिस प्रणालिचा वापर, यामुळे कामकाजास गती आली आहे. आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन व पोषक वातावरण आणी परवानग्या, नोंदणी, कर भरण्याची प्रणाली सुलभ व सोपी करण्यात आली. अधिकारी,कर्मचारी प्रशिक्षण व सेवा विषय बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात आला. घरकुल लाभार्थींच्या अडचणी समजून घेवून सोडविण्यास प्राधान्य. शिवाय धुळे जिल्ह्याचा कॉपीमुक्त अभियान धूळे कॉपीमुक्त अभियान पॅटर्न म्हणून राज्यभरात नावारूपाला येत असून या उपक्रमाचे शिक्षणमंत्री, मुख्यसचिव व शिक्षण आयुक्त यांनी कौतुक केले. या विविध उपक्रमांसोबतच पुढील उर्वरित दिवसांचे उत्कृष्ठ नियोजन आदिचे अतिशय उत्कृष्ठ सादरीकरण जि. प. मुख्याधिकारी विशाल नरवडे यांनी केल. याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे याच्यांसह जिल्हातील प्रशासनातील सर्व अधिका-यांनी जिल्ह्याचा मान वाढविल्याबददल त्यांचे कौतुकही केले.
Discussion about this post