
चंदगड/प्रतिनिधी : भारताचे आराध्य दैवत व आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह तसेच इतिहास संशोधक लेखक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या डॉक्टर प्रशांत कोरटकर याचेवर कडक कारवाई करणेबाबचे मुख्यमंत्री यांच्या नावे असणारे निवेदन चंदगडचे तहसीलदार व चंदगड पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
मराठा व ब्राह्मण समाजाचे संबंध सलोख्याचे असून या दोन्ही समाजात भांडण लावण्याचे काम करणारे व स्वतःला डॉक्टर म्हणून मिरवणारे प्रशांत कोरटकर याच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावे तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी बोलणाऱ्या राहुल सोलापूरकर याच्यावर देखील कारवाई झाली नाही.

अश्या प्रकारच्या समाजकंटकामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन समाजामध्ये दंगल भडकून दुर्घटना घडली तर राज्याचे प्रमुख या नात्याने या सर्व घटनेची जबाबदारी आपल्यावर राहील.त्यामुळे आपण गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच पुणे येथे झालेल्या अत्याचार प्रकरणी देखील आरोपीला कडक शासन व्हावी असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर पूजा शिंदे, पुनम भादवणकर, लीला सावंत, पूनम कडूकर, साक्षी देसाई, रूपाली शेडेकर, हर्षदा कुंभार यांच्यासह चंदगड तालुका रणरागिनी ग्रुपच्या सदस्यांनी सही केली.
Discussion about this post