उदगीर /कमलाकर मुळे: उदगीर शहरालगत असलेल्या निडेबन येथील लिंकन इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन उदगीर येथील उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा संस्थाप्रमुख दिलीप कुमार गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्कूल मधील विद्यार्थ्यांनी देशभक्ती भारतीय संस्कृती संस्कार ,नीतिमत्ता, व्यसनमुक्ती आणि वृद्धाश्रम अधि विषयावर उत्तम सादरीकरण केले .स्कूलच्या प्राचार्य मीनाक्षी डोंणगापुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. लिंकन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने वर्षभर मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर, शैक्षणिक, प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
Discussion about this post