
आव्हा येथे शिवरात्री महोत्सव मोठ्या थाटामाटात,
सप्रेम जय हरि,
आव्हा येथे शिवरात्री महोत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदात पार पडला. महाशिवरात्रीच्या पर्वावर दिनांक 27 फेब्रुवारी रोज बुधवार या दिवशी समस्त गावकरी आव्हा मंडळी यांच्यातर्फे सामूहिक फराळाचे आयोजन पुजन करण्यात आले होते रात्रीला भजन संध्या ठेवण्यात आली होती . दुसऱ्या दिवशीला 28 फेब्रुवारी रोज गुरुवार रोजी दणदणीत जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम ह. भ. प. दर्शन महाराज हिवाळे.रा. पिंपळगाव देवी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला दर्शन महाराज यांचे वय अवघे फक्त सात वर्षांचे आहे त्यांचे शिक्षण इयत्ता दुसरा वर्ग पिंपळगाव देवी येथे सुरू आहे एवढ्या अल्पशा वया मध्ये त्यांचा अभ्यास त्यांची चिकाटी त्यांचे पाठांतर व्यासपीठा वरील त्यांचे कला कौशल्य आणि भरपूर असं गायन यांनी सर्व गावकऱ्यांचे मन वेदुन घेतले त्यांच्या सहकार्याला त्यांच्याच वयोगटातील लिहा येथील बाल टाळकरी मंडळ त्यांनी सुद्धा त्यांच्या कीर्तनाच्या संगतीला चांगल्या पद्धतीने सहकार्य करून एक ज्ञानाचा कार्यक्रम सामाजिक उपक्रम जनाजनात मनामनात रुजविला गावातील लहान मुलांमध्ये एक आदर्शाची भावना रुजवली आणि समाजाला चांगल्या सुसंस्कृत पणाकडे वाहुन नेण्याचा हा एक प्रयत्नच आहे. अध्यात्मिक शक्ती सोबत एक सामाजिकता खूप चांगल्या पद्धतीने जोडल्या जाऊ शकते आणि येणारा काळ हा सुसंस्कृत मुलांच्या द्वारे किंवा तरुणांच्या द्वारे आपले गाव परिसर हा समृद्ध होऊ शकतो विचारवंत गुणी जन घडू शकता मुल घडलेत तर देश समृद्ध होईल यात तिळ मात्र शंका नाही समाजातील जबाबदार लोकांनी अशा कार्यक्रमाचे वेळोवेळी ठिकठिकाणी आयोजन करणे हे अति महत्त्वाचे आहे. लोकांची व्यसनमुक्ती व्हावी गावागावात स्वच्छता नांदावी तरुणांमध्ये उद्योजक करण्याची स्फुर्ती यावी तरुणउद्योजक व्हावे उद्योग करण्याची भावना निर्माण व्हावी अध्यात्म हा सुखी जीवनाचा पाया आहे महाराष्ट्र हा संतांची माय भूमी आहे आणि अशा या मायभूमी मध्ये अशी मुले घडलीत तर माझा देश सुखी समृध्दी होण्यास उशिर लागगणार नाही.
या कार्यक्रमासाठी समस्त गावकरी मंडळी आव्हा यांनी भरपूर प्रयत्न केलेत आणि या कार्यक्रमासाठी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य जिल्हा संघटन प्रमुख आणि भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांचे कडून मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात आले.
मिलिंद पाटील यांनी आशा व्यक्त केली, असे कार्यक्रम माझ्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आयोजित करुन प्रसारित प्रचारित करण्यात यावे आणि माझा जिल्हा अध्यात्माद्वारे समृद्ध व्हावा.
आणि हा देश माझा मि ह्या देशाचा ही भावना मनाला सदैव प्रेरित करत राहो.
जय हिंद,जय भारत.
👏🏼👏🏼
Discussion about this post