
उदगीर /कमलाकर मुळे :
उदगीर येथे लोकसंस्कृती साहित्य संमेलन 2025 संमेलनात प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते साहित्यिक कथाकार संपादक व उत्कृष्ट पत्रकार शंकर बोईनवाड यांचा ‘आदर्श नगरीचा राजू किशोर’ कादंबरीचे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने आदर्श शिक्षक समितीच्या वतीने कादंबरीकार शंकर बोईनवाड यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रदीप तळेगावकर ,उदगीर तालुकाध्यक्ष पुंडलिक मुळे, उदगीर कार्याध्यक्ष रमेश खंडोमलके व शांत कुमार बिरादार आदी मित्र परिवार उपस्थित होते..
Discussion about this post