AIMIM पक्षाचा 67 वा स्थापना दिवस गडचिरोली जिल्हा जनसंपर्क कार्यालय येथे केक कापून उत्साहाने साजरा करण्यात आला.
या वेळी AIMIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख यांनी पक्षाची विचारधारा ही प्रत्येक समाजाच्या, समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला लागावे आणि पक्षाची विचारधारा जनसामान्य लोकांपर्यंत पोहचवून पक्षाला बळकट करण्याकरिता काम करावे असे आवाहन करण्यात आले.
महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद यांनी मार्गदर्शन करतांना महिलांना प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत करणार आणि प्रत्येकाची समस्या तातडीने सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असे बोलत होते.
या कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महासचिव मुकेश डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख यांनी केले.
स्थापना दिवस कार्यक्रमाला AIMIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा.बाशिद शेख, महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, युवा जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, जिल्हा महासचिव मुकेश डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष विपीन सुर्यवंशी, तेजराम नेतनकर, कोमल राजपूत, गावडे ,जिशान शेख, मुन्ना रामटेके, शोभा शेरकी, किरंगे, सुनंदा जेंगठे, इंदिरा पाल, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discussion about this post