प्रशांत पाटील /अहिल्यानगर संपादक –
कोपरगाव : डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग येथील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पदमश्री पुरस्कार प्राप्त माननीय श्री. अप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनातून समाजामध्ये स्वछतेबद्दल व आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देश समोर ठेऊन प्रतिष्ठान तर्फे रविवार २ मार्च रोजी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कोपरगाव बस स्थानक, पोस्ट ऑफिस, ग्रामीण रुग्णालय, पशु वैद्यकीय दवाखाना या ठिकाणी स्वछता करत अभियान राबविण्यात आले.
यावेळी कोपरगाव नगरपरिषचे मुख्याधिकारी सुहास जगताप, बापूसाहेब आरणे आरोग्य विभाग तसेच कर्मचारी वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्वछता उपक्रमामध्ये गिरीश खेमनर वाहतूक निरीक्षक, अमित पोक्षे वाहतूक निरीक्षक, गिरीश गुट्टे वैद्यकीय अधीक्षक, जाधव साहेब, ढेपले साहेब, गोर्डे मामा, दहे साहेब पशुधन विकास अधिकारी यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले..
Discussion about this post