शशिकांत तांबे -देवळा प्रतिनिधी –
भावडबारी घाट ते गुंजाळ नगर रस्त्याच्या पोलिस बंदोबस्तात सुरू झालेल्या कामाला उच्च न्यायालयाकडून सात दिवसांची स्थगिती मिळाली आहे यात भुधारक शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गने ताब्यात घ्यायच्या आहेत मात्र राष्ट्रीय महामार्ग कायदा अनुषंगाने नुकसान भरपाई न कोणतेही मिळाल्याने अधिकार्यांनी कोणतेही संपादन हाती न घेता 7 मार्च पर्यंत उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिनांक 28 रोजी सदरच्या कामाला स्थगिती दिली आहे.
भावडबारी घाट ते रामेश्वर फाटा या द्विगती मार्गाच्या कामाला व रामेश्वर फाटा ते गुंजाळ नगर चॏपदरीकरणाचे काम दिड वर्षांपासून अधिग्रहण संभ्रमामुळे रखडले आहे . मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी पोलिस बंदोबस्तात महामार्ग चे काम सुरू झाले होते.परंतु याबाबत विठ्ठल यमाजी कांदळकर , संजय सखाराम गुंजाळ, साधना भाऊसाहेब गुंजाळ, तेजस दिलीप अहिरराव या चॏघांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने सदर महामार्गाच्या कामाला सात दिवसांची स्थगिती दिली आहे.
Discussion about this post