(ता.प्र)शेख मोईन..
किनवट :
कोठारी (चि) येथील ‘राजनगरी’ नावाने प्लॉटविक्री व्यवसाय करणाऱ्यांनी फसवणूक केल्याची तक्रार महेश शरदराव कंचर्लावार आणि सौ. सारिका महेश कंचर्लावार यांनी किनवट पोलिसांकडे लेखी स्वरुपात दिली आहे. मात्र यावर पोलिसांनी अजून काहीच पावले उचललेली नाहीत.
किनवट शहरातील लोहार गल्लीतील रहिवासी महेश व सौ. सारिका कंचर्लावार यांची फसवणूक झाल्यामुळे त्यांनी २ फेब्रुवारी रोजी फसवणूक करणाऱ्या प्लॉट व्यावसायिकांविरुध्द किनवट पोलीसात तक्रारदाखल केली आहे. कोठारी शिवारात आदिवासी शेतकऱ्याची जमीन आहे. या जमिनीवर ‘राजनगरी’ नावे प्लॉट विक्री करण्यात
आली. दि. १ जुलै २०१४ रोजी सौ. सारिका कंचर्लावार यांच्या नावाने मालमत्ता क्र.१०८७/१११ प्लॉट क्र. १११ हा खरेदी करुन चाडावार नावाच्या प्लॉट व्यावसायिकास सौदेचिठीवर पंचासमक्ष ५५ हजार रुपये दिल्याचा तक्रारीत ऊल्लेख केला आहे.
दि. ७ जुलै रोजी मालमत्ता क्र.१०८७/१२० प्लॉट क्र. १२० हा महेश कंचर्लावार यांनी खरेदी करुन ५३ हजार रुपये पंचासमोर गटलेवारांना देऊन सौदाचिठ्ठी केल्याचा उल्लेख या तक्रारीत करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे १ लाख ८ हजार रुपये घेवूनही प्लॉट मालक चाडावार व गटलेवार यांनी ही रक्कम परत केली नाही आणि प्लॉटही कायदेशीर मालकीचा करुन दिला नाही. अनेक वर्षे होवूनही दस्तनोंदणी कार्यालयात
गेल्यावरही याची दस्तनोंदणी होवू शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे चाडावार व गटलेवार यांनी आमची फसवणूक केली आहे. दोघांनीही मूळ आदिवासी शेतमालकाची तांत्रिक अडचण असून ती दूर झाली की दस्तनोंदणी करुन देवू असे आमिष दाखविले.
आजही त्या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतीचा ७/१२ कायम असतांना ग्रामपंचायतीने अकृषक न केलेल्या ले-आऊटला हस्तांतरणासाठी मंजूरी दिलीच कशी?, दस्तनोंदणीसाठी गावठाणसह लागणारे कागदपत्र देणारे सुद्धा फसवेगिरी प्रकरणास तेवढेच जबाबदार ठरतात असेही कंचर्लावार यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिस संबंधीतांविरुध्द चौकशी करुन कारवाई करतील काय असा सवाल या दाम्पत्यांने केला आहे..
Discussion about this post