
निलेश सोनोने,
ग्रामीण प्रतिनिधी पातुर..
पातुर तालुक्यातील चोंडी गावापासून ते मेडशी रस्ता बनवण्यात आला यावर लाखोचा खर्च करण्यात आला. मात्र एक वर्ष उलट उलटले नाही तर या रस्त्याची पार दुरवस्था झाली असून रस्त्याच्या मधोमध मोठे महाकाय गड्डे पडले आहेत. तर रस्त्याच्या कडेला सुद्धा मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असून रस्त्यावरील खड्डे वाचवण्याचा प्रयत्नात अपघात सुद्धा होत आहे. मागील दिवसात दी.27/2/25 रोजी महिंद्रा पिकप वाहन हे मेडशी कडून चोंडीकडे येत होती त्यामध्ये माल भरलेला होता. मात्र खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात सदर पिकप महिंद्रा वाहन पलटी झाल्याचे आणि त्यामधील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक जखमी झाल्याची घटना घडलेली आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने वाहनधारकांमध्ये संताप उद्रेक वाढत आहे. शासनाने त्वरित या रस्त्याची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
चोंडी ते मेडशी रोड तयार करून एक वर्षही झाले नाही तरी संपूर्ण रोड उघडलेला आहे. ग्रामीण भाग असल्यामुळे शासनाचे व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष होत आहे.या रोडवर महिंद्रा पिकप पलटी झाला असून याच प्रकारे या रोडवर रोज अपघात होत आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी. अन्यथा या रस्त्यावरच संपूर्ण ग्रामस्थ उपोषण करू.
अजय कवडे,
सामाजिक कार्यकर्ता..
Discussion about this post