अंमलबजावणीसाठीचे निवेदन
आजरा: प्रतिनिधी,
मा.प्रशासकसो,
नगरपंचायत,आजरा तथा उपविभागीय अधिकारीसो,उपविभागीय अधिकारी कार्यालय,गारगोटी
द्वारा मा.तहसिलदारसो,
आजरा तहसिलदार कार्यालय,आजरा
मा.मुख्याधिकारीसो,
नगरपंचायत आजरा ता.आजरा
जि.कोल्हापूर
मा.उपअभियंतासो,
सा.बां. उपविभाग (PWD), आजरा
मा.उपकार्यकारी अभियंतासो,
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्या.,
उपविभाग आजरा ता.आजरा जि.कोल्हापूर
मा.पोलीस निरीक्षकसो,
पोलीस स्टेशन आजरा
विषय: 1)कनिष्ठ अभियंता, सा.बां. उपविभाग, आजरा यांनी आपणास जा.क्र. रेशा-1/ 112/ 2025 दि.14-2-2025 रोजी दिलेल्या पत्रानुसार आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगर वसाहतभागात पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा ताबडतोब मिळाल्या पाहिजेत. यासाठी सदर निधीमध्ये भारतनगर वसाहत मध्ये कामांची यादी बनवताना या वसाहतीमधील सर्व कामे रस्ते,गटर्स आणि सांडपाणी ओढयाला जाण्याची सोय झाली पाहिजे.याबाबत….
2)आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगर भागात पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा ताबडतोब झाल्या पाहिजेत.मुक्ती संघर्ष समितीने दि.24-02-2025 रोजी व आज दि.3 मार्च,2025 रोजी दिलेल्या निवेदनातील मागण्यांबाबत ताबडतोब कार्यवाही व अंमलबजावणी झाली पाहिजे.
3)या संदर्भात आपण ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही. तर सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी “संघर्ष मोर्चा” काढणार होतो. आंदोलन करणार होतो.मात्र कायदासुव्यवस्था बिघडू नये.कायदयाचे उल्लंघन होऊ नये.यासाठी आज आम्ही आपणासमोर बैठक करून आमच्या मागण्या मांडत आहोत.याकडे आपण सर्व विभागांनी (1.नगरपंचायत,आजरा 2.सार्वजनिकबांधकाम विभाग PWD 3.महाराष्ट्र महावितरण विभाग आजरा) ताबडतोब लक्ष देऊन त्या मागण्यांचा विचार करून त्या मागण्या सोडवाव्यात….
संदर्भ-1)मुक्ती संघर्ष समिती या संघटनेने दिलेली सर्व निवेदने-
2)कनिष्ठ अभियंता, सा.बां. उपविभाग, आजरा यांनी मुख्याधिकारी,नगरपंचायत यांना जा.क्र. रेशा-1/ 112/ 2025 दि.14-2-2025 रोजी दिलेले पत्र-
3)मा.उपअभियंता, सा.बां. उपविभाग, आजरा यांचे मुक्ती संघर्ष समितीला जा.क्र. रेशा-1/153/ 2025 दि.25-2-2025 रोजी दिलेले पत्र-
महोदय,
वरील विषयास व संदर्भास अनुसरून आमचे म्हणणे असे आहे की ,भारतीय संविधानाच्या कलम 243W (Article 243W) मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार आणि कर्तव्यांबद्दल सांगितले आहे. या कलमांद्वारे नगरपंचायतींना स्थानिक पातळीवर विविध सेवांचा पुरवठा करणे आवश्यक आहे, ज्यात सांडपाणी व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे.तसेच आरोग्य व आरोग्यविषयक सेवासाठी कलम 252 (2) - महाराष्ट्र नगरपरिषदा कायदानुसार नगरपंचायतींना नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे आणि रोग नियंत्रणासाठी आवश्यक सेवा देणे यासाठी अधिकार प्राप्त आहेत.
आपल्या नगरपंचायतीच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा अत्यंत आवश्यक ठरल्या आहेत. आमच्या भागात काही महत्त्वाच्या सुविधांचा अभाव आहे ज्यामुळे लोकांचे जीवन प्रतिकूल होत आहे. या संदर्भात भारतनगर मधील लोकांनी अगोदर निवेदने दिलेली आहेत. आता मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने भारतनगर (आजरा शहर)यांच्यासाठी खालील मागण्या करण्यात येत आहेत. याची निर्गत कायमस्वरूपी झाली पाहिजे. यासाठी आपण प्राधान्याने भारतनगर वसाहती मधील कामांची यादी बनवली पाहिजे. आणि काम ताबडतोब सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवले पाहिजेत.
आमच्या मागण्या
1)कनिष्ठ अभियंता, सा.बां. उपविभाग, आजरा यांनी आपणास जा.क्र. रेशा-1/ 112/ 2025 दि.14-2-2025 रोजी दिलेल्या पत्रानुसार आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगर वसाहतभागात पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा ताबडतोब मिळाल्या पाहिजेत. यासाठी सदर निधीमध्ये भारतनगर वसाहत मध्ये कामांची यादी बनवताना या वसाहतीमधील सर्व कामे रस्ते,गटर्स आणि सांडपाणी ओढयाला जाण्याची सोय झाली पाहिजे.याबाबत….
2)पापा लतिफ घर ते कालेकर घर गटर्स करणे-
3)इम्रान काकतीकर घर ते मुबारक काकतीकर गटर्स व रस्ता करणे-
4)राजू चौगुले घर ते मकसूद माणगावकर घर गटर्स व रस्ता करणे-
5) भारतनगरमधील लहान मुला मुलींच्या साठी गट नं. 417 ब. मधील ओपन स्पेसमध्ये अंगणवाडी व गार्डन करणे-
6)सलीम नाईकवाडे घर ते मकसूद माणगावकर घर रस्ता व गटर्स करणे-
7)भारतनगरमधील गटारीचं सांडपाणी ओढ्याला पोहचविण्यासाठीची सुयोग्य खात्रीशीर व्यवस्था करणे-
8)इमरान काकतीकर घरासमोरच्या बाजुला केलेली नविन गटार सरळ करणे-
9)बशीर शेख यांच्या घरापासून इकबाल नसरदी यांच्या घरापर्यंत असलेली गटर्सच्या सांडपाण्याचा सुयोग्य पद्धतीने निचरा करणे.
10)बशीर नसरदी ते इकबाल नसरदी घरापर्यंत रस्ता करणे-
11)भारतनगर मध्यें पिण्याचे पाणी ३ ते ४ दिवसातून एकदा सोडत आहेत.तर पाणी दररोज सोडायला हवे आहे.
12)आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगर मध्ये “स्ट्रीट लाईट” ताबडतोब जोडून मिळाली पाहिजे…!
13)मौजे आजरा येथील भारत नगर (वार्ड क्र. १) येथील लो व्होल्टेज चे निवारण करून ज्यादाचे व्होल्टेज मिळावे.याबाबत….
14)भारतनगर मध्यील सर्व एरियामध्ये सगळीकडे रस्ते झालेच पाहिजेत…!
15)भारतनगरमध्ये गटारीच्या सुविधा करून सांडपाण्याची सुयोग्य व्यवस्था झाली पाहिजे…!
16)भारतनगर वसाहतीमध्ये केलेल्या कामांची, झालेल्या कामांची व नियोजित कामांची यादी मिळाली पाहिजे….
यासंदर्भात ठोस पावले प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली पाहिजेत.आपण यामध्ये लक्ष घालून आजरा शहरातील भारत नगर मधील वसाहतीत राहणाऱ्या लोकांना न्याय द्याल अशी अपेक्षा आहे.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत.
या संदर्भात आपण ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही. तर पुन्हा "संघर्ष मोर्चा" काढून "बेमुदत ठिय्या आंदोलन" करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये.याची नोंद घ्यावी...!
माहितीसाठी निवेदन सादर…
1)मा.नाम.प्रकाश आबिटकरसो, पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन
2)मा.जिल्हाधिकारीसो, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
आपले विनित
संग्राम सावंत समीर खेडेकर मजीद मुल्ला
राज्याध्यक्ष जिल्हा संघटक तालुका संघटक
अब्दुलवाहिद सोनेखान सलीम शेख(सर) तौफिक माणगावकर सल्लाउद्दीन शेख
खुदबूद्दीन तगारे गुलाब शिकलगार सलीम नाईकवडे मुदस्सर इंचनाळकर
यासीन सय्यद(सर ) नईम नाईकवडे शौकत पठाण आसिफ मुराद
सलीम ढालाईत रहुफ नसरदी सल्लाउद्दीन नसरदी मोईन शेख
मुबारक नसरदी आसिफ काकतीकर पापा लतीफ मोहम्मद नसरदी
फहीम नसरदी रहीम लतीफ रशीद लाडजी
मुफीद काकतीकर
Discussion about this post