

अकोट (डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी )
आज सकाळी 8.45 वाजता अकोट पोपटखेड मार्गांवर धावत्या बस ने अचानक पेट घेतल्याने बस आगीत राख झाली आहे. आज सकाळी अकोट आगाराची बस क्र. MH-40N 9893 अकोट ते शहानूर प्रवासी घेऊन जात असतांना पोपटखेड मार्गांवरील भूतडा यांच्या फॉर्म हाऊस जवळ धावत्या बस ने अचानक पणे पेट घेतला,बस चालकाने बस चालकाने समय सूचकता दाखवत बस साईड ला लावून प्रवासी यांना खाली उतरविले त्यामुळे जिवीत हानी टाळाली. सदर आग शॉक सर्किट ने लागल्याचे सांगण्यात येत आहे..
Discussion about this post