

आज सरकारने आम्हाला अडवले पण आम्ही रान पेटवूच – सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी सरकारला दिला इशारा..
शहीद सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळावा यासाठी माझ्या संयोजनातून आज मुंबई येथे आंबेडकरी संघटना सर्व पक्ष संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी सहभाग घेतला.यावेळी मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या हजारो भीमसैनिकांना पोलिसांनी अडवले. बराच वेळ आंदोलक आणि पोलिसांत इथे संघर्ष झाला.शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना बोलवून घेत मागण्या मान्य करण्याबाबत त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लावुन मागण्या मान्य केल्या जातील हे आश्वासन दिले.तेंव्हा हे आंदोलन मागे घेतले पण लढा सुरूच राहणार.परभणी झालेल्या अन्यायाची लढाई मुंबईतून जिंकणार.आज जरी सरकारने आम्हाला अडवले असले मी स्वस्थ बसणार नाही असे सर्वांना आश्वासित केले..
Discussion about this post