


पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली..
सध्या महाराष्ट्रातील गुन्हेगारांना शासन आणि पोलीस यांचा पाहिजे तसा वचक राहिला नाही असे प्रतिपादन मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केले आहे.संतोष देशमुख निघृण हत्या, कैलास बोराडे यांच्या शरीरावर दिलेल लोखंडी रॉड चे चटके, स्वारगेट बस स्थानकात महिलेवरील अन्याय, वगैरे वगैरे घटनांनी लोक हादरलेले आहेत,अशा घटना म्हणजे राज्याला एक प्रकारे लागलेला कलंक आहे,या घटनेतील काही आरोपी पोलिसांना अजून सापडलेले नाहीत,ही अत्यंत खेदाची बाब आहे, अन्याय झालेली व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची आहे ,यांचा विचार न करता ती एक व्यक्ती आहे,यांची जाणीव ठेवावी.माणुसकीला काळीमा फासणारी घटना, संवेदनशील मनाचा थरकाप उडविते, ज्या समाजातील व्यक्ती वर अशा प्रकारे अन्याय झाला आहे त्याच्या बाजूने त्याचा समाज उभा राहून न्याय मागत असेल तर बिघडले कुठे? पोलीस व शासन यांनी यांना आवर नाही घातला तर ते आणखी निर्भिड,बेडर होऊन दुसरे गुन्हे करतील.अशा गुन्हेगारांना वेळी च अटक करुन कठोर कारवाई होणे गरजेचे आहे..
Discussion about this post