नमस्कार..
शिरूर तहसीलदार कार्यालयाच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचार विरोधात दिनांक ४ मार्च २०२५ पासुनचे आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर दोन वेळा मा. तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी शिरुर यांच्या बरोबर बैठक झाली.
महसूल विभागाच्या कामकाजाची विविध माहिती मागितली होती. पैकी ५०% टक्के माहिती प्राप्त झाली असुन ५०% माहिती १५ दिवसात देण्याचे लेखी मान्य केले असुन तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
दरम्यान तलाठी /मंडलाधिकारी यांच्या कामकाजाबाबत ही चर्चा झाली. मा. तहसीलदार यांनी याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत तरीही कोणी अडवणूक करत असेल तर सांगा असे सांगितले आहे.
ज्यांच्या तलाठी / मंडलाधिकारी यांनी जाणिवपुर्वक कालावधी पुर्ण होऊनही नोंदी अडवल्या आहेत, त्यांनी त्याबाबत तातडीने संपर्क साधावा, तलाठी कार्यालयात डमी तलाठी काम करत असल्यास फोटो काढून पाठवावेत, तलाठी, मंडलाधिकारी ठरलेल्या दिवशी वेळेवर गावात येत नसतील, तर त्याबाबत ही आपण माहिती द्यावी.
भुमी अभिलेख कार्यालयाने जसे मोजणी चे दौरे जाहीर करायला सुरुवात केली आहे, त्या धर्तीवर त्या त्या महीन्यांतील नोंदीची माहीती जाहीर करण्याबाबत विचार सुरू आहे.
त्यामुळे जाणिवपुर्वक नोंदी अडवण्याचा उद्योग बंद होण्यास मदत होईल.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
त्याच बरोबर रेशन कार्ड मधील दुरुस्ती आॅनलाईन होत आहे. परंतु त्यासाठी मनमानी पद्धतीने जवळपास २ हजार रुपयांपर्यंत पैसे मागत असल्याच्या तक्रारी आज नागरीकांनी समक्ष भेटुन सांगितल्या. त्याबाबत पुरवठा अधिकारी यांनी जास्तीत जास्त ५० रुपयेच यासाठी द्यावेत असे सांगितले तर स्वतः लाही ही दुरुस्ती अगदी सहज करता येते असे पुरवठा अधिकारी यांनी सांगितले.
जर कोणी यासाठी जास्त पैसे मागितले किंवा दुरुस्ती करुन देण्यास टाळाटाळ केली तर संपर्क साधावा.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संजय शिवाजी पाचंगे
प्रदेश उपाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Discussion about this post