
महागाव तालुका प्रतिनिधी :-
आज समाजामध्ये रिती तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. धनोडा हिवरा व परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जाते. मागील काळातही हिवरा येथे रेती तस्करांवर कार्यवाही झाली होती .
पण धनोडा परिसरात मोठ्या प्रमाणात रीतीचि तस्करी केली जात असल्याचे नागरिकांकडून कानी पडत आहे.
गाव खेड्यामध्ये बऱ्याच प्रमाणात विटीचे बांधकामे होत आहे.तसेच घरकुले ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात नागरिकांना मिळालेले आहे.आणि मग या सर्व बांधकामावर रेती तर लागतेच मग ती रेती कुठून व कशी आणली जाते हा प्रश्न नागरिकांच्या मनाला सतावत असल्याने आणि बऱ्याच प्रमाणामध्ये गावांमध्ये रेतीचे ढीगारे हे दिसत असतात. मग हे आले कुठून व कसे आणि प्रत्येका कड रॉयल्टी काढून विकत घेतलेलीच रेतिआहे की मग ती रेती चोरीची आहे हा प्रश्न नागरिकांना सतावत असतानाच हिवरा येथे आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान महागाव चे आदरणीय लघिमा तिवारी मॅडम ( भा. प्र .से ) सह जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महागाव व आदरणीय सखाराम मुळे सर उपविभागीय अधिकारी उंबरखेड यांच्या मार्गदर्शना मध्ये आदरणीय अभय मस्के तहसीलदार महागाव, मंडळ अधिकारी महागाव राम पंडित,ग्राम महसूल अधिकारी सुनील बोईनवाड,अनिल खडसे,दीपक दिवेकर,अश्विन बलखंडे,महसूल सेवक अमोल जामकर,जीवन जाधव,यांच्या सहकार्याने मौजे हिवरा संगम जवळील नदीतून अवैधरीत्या रेती चोरून नेणारे वाहन पकडून तहसील कार्यालय महागाव येथे लावण्यात आले आहे. सध्याच्या काळात गौण खनिज तस्करी विरोधात महसूल प्रशासनाने चालू केलेल्या कारवाई मुळे रेती तस्करांचे धाबे दणानले असून होत असलेल्या कार्यवाहीचे सर्वत्र नागरिकाकडून अभिनंदन केल्या जात आहे..
Discussion about this post