


प्रतिनिधी ( रमेश तांबे ) :
कळवा येतील वगोबा नगर येथील स्थानिक रहिवासी यांना अनेक वर्ष पाणी समस्या फार मोठी जाणवत आहे. अनेक वर्षा पासून वगोबा नगर येथे पिण्याच्या पाण्याची फार मोठी गैर सोय झाली असून स्थानिक नगर सेवक, आमदार जाणून बुजून दुर्लक्ष करत असून या ठिकाणी पाण्याची फार मोठी समस्या असल्या कारणाने बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे नेतृत्व माननीय येवले सर, संजय मोरे सर, देशमुख सर, स्थनिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी सभेत १७ मार्च रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे व ठाणे महानगर पालिकेवर मोर्चा काढण्याचे निर्णय बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने नियोजन करण्यात आले आहे, तरी सर्व पद अधिकारी वा स्थानिक रहिवाशी व महिलांनी उपस्थिती राहण्याचे ठरवले आहे, तरी सर्वांनी उपस्थिती राहावे..
Discussion about this post