प्रतिनिधी धनेश बाळासाहेब कबाडे ( 9022972524 ) – नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सरळ मार्गानेच व्हावा या मागणीसाठी आज सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची बैठक पार पडली. याआधी या रेल्वे मार्गाला मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि माझ्याकडून विरोध असल्याच्या अफवा समाज माध्यमांत पसरवल्या गेल्या, मात्र हा रेल्वे मार्ग आर्थिक दृष्ट्या न परवडणारा असल्याकारणाने बदलला जात आहे अशी माहिती आ. सत्यजित तांबे यांनी बैठकीत उपस्थित सर्वांना दिली.या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सर्वपक्षीय सहकार्याने सकारात्मक पावले उचलण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. लोकांच्या हिताचा विचार करून हा प्रकल्प सरळ मार्गानेच व्हावा यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्र्यासोबत बैठक घेण्याचे ठरले आहे.यावेळी बैठकीला मा.मंत्री माणिकराव कोकाटे साहेब, आ.अमोल खताळ, आ. दिलीप वळसे पाटील साहेब, आ. सत्यजित तांबे त्याचबरोबर आ. शरददादा सोनवणे, आ. बाबाजी काळे, खा. डॉ. अमोल कोल्हे, खा.भाऊसाहेब वाकचौरे, खा. राजाभाऊ वाजे यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला….

Discussion about this post