
.. “अबू आझमी सारख्या माणसाला औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे”मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.जर अबू आझमी ला औरंग्याची जास्तच आठवण येत असेल तर त्यांच्या कबरीसाठी औरंग्याच्या कबरीच्या बाजूला अबू आझमीची कबर खोदून ठेवू असा इशारा मंत्री नितेश राणे पत्रकारांशी बोलताना दिला.औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांचे ज्या पद्धतीने हाल केले ते आज जगभर पाहिले जात आहेत. हिंदवी स्वराज्याची लढाई इस्लाम विरोधात होती आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून औरंग्या विरुद्ध लढा दिला. ही लढाई इस्लामच्या विरोधात होती. त्यावेळी कोणताही सेक्युलर शब्द सुद्धा अस्तित्वात नव्हता. सेक्युलर हा काँग्रेसने आणलेला शब्द आहे.हे या जिहादी विचारांच्या आणि मानसिकतेच्या कारट्यांना कळेल तेव्हा ते औरंग्याला स्वप्नात पाहायचे बंद होतील. असे मंत्री नितेश राणे यांनी सुनावले.दरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी , “औरंगजेब एक उत्तम शासक होता.अशी औरंगजेबची प्रशंसा करणारी वक्तव्य केली होती. त्याचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. आझमी च्या या वक्तव्याचा मंत्री नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अबू आझमी सारख्या माणसाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला कबर खोदली पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे.
Discussion about this post