
अकोट (डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी ) :
अकोट :
अकोला शहरातील पोतदार शाळेतील 13 वर्षाच्या मुलीचे आज दोन वाजता अपहरण झाले. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे साडेपाच वाजेपर्यंत मुलीचे बोनीफाईट सर्टिफिकेट घेऊन या म्हणून पोलिसांनी सांगितले व कुटुंबियांची तक्रार घेण्यात आली नाही.
सदरची घटना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना समजतात, त्यांनी सिविल लाईन पोलीस स्टेशन येथे निषेध करण्याकरीता ठिय्या आंदोलन केले व आरोपींना अटक करण्याची मागणी केली.जो पर्यंत आरोपीना अटक करणार नाही तो पर्यंत आम्ही पोलीस स्टेशन मधून हटणार नाही असे ठिय्या आंदोलनात सहभागी असलेल्या वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी यांनी सारथी महाराष्ट्राचा सोबत बोलताना सांगितले..
Discussion about this post