





प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी :
परभणी, दि. 04/03/2025. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या अवमानाची घटना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विजय एल. आचलिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज त्यांनी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देऊन परिसराची पाहणी केली तसेच शहरातील काही दुकानांची पाहणीही केली. त्यानंतर नवा मोंढा पोलीस स्थानकाला भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, नवा मोंढा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग गवते आदी अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी, सकाळी निवृत्त न्यायमूर्ती श्री. आचलिया यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मनपा आयुक्त यांच्या समवेत बैठक घेऊन घटनेचा सविस्तर आढावा घेतला..
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post