
श्री. रमेश राठोड
आर्णी :
दिनांक 2/3/ 2025 ला अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेची यवतमाळ शासकीय विश्रामगृह येथे सभासदाचे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री गजानन मुदगल अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष यांनी स्वीकारले. विशेष अतिथी म्हणून मा. श्री देवेंद्रजी तिवारी राष्ट्रीय प्रधान महासचिव अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद यांनी भूषविले. मार्गदर्शक म्हणून मा. श्री प्रभाकर वानखेडे विधी सल्लागार महाराष्ट्र राज्य मा. श्री संजय जाधव पश्चिम विदर्भ अध्यक्ष मा. सौ संगीता ताई गावंडे पश्चिम विदर्भ महिला अध्यक्ष मा. सौ उज्वला महाजन पश्चिम विदर्भ महिला उपाध्यक्ष यांनी स्वीकारले .प्रथम स्वागत समारंभ झाला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष मा.श्री कैलास गावनर यांनी प्रास्ताविक त्यांनी जिल्ह्यात कशाप्रकारे तालुका कार्य करण्यात तयार झाल्या व किती राहिलेले आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली व कामकाज कशा प्रकारे करायचे याबद्दल मार्गदर्शन करण्यास पाहुण्यांना विनंती केली .प्रथम मा. श्री प्रभाकर वानखेडे यांनी संघटने बद्दल माहिती दिली व कशाप्रकारे काम करावे हे सविस्तर सांगितले .त्यानंतर मा. श्री देवेंद्रजी तिवारी राष्ट्रीय प्रधान महासचिव यांनी काम करताना येणाऱ्या अडचणी व काम कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पश्चिम विदर्भ अध्यक्ष मा.श्री संजय जाधव ,मा. सौ संगीता गावंडे पश्चिम विदर्भ महिला अध्यक्ष, मा. सौ उज्वला महाजन पश्चिम विदर्भ महिला उपाध्यक्ष यांनी आपले विचार मांडले व काही सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले व कामकाजात येणाऱ्या अडचणी बद्दल प्रश्न विचारले नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री गजानन मुदगल अध्यक्ष महाराष्ट्रा राज्य यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व कामकाजा बद्दल सविस्तर माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सौ मीनाक्षी ताई गाढवे शहराध्यक्ष यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. श्री पवन भाऊ थोटे जिल्हा सचिव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता सौ मीनाक्षी ताई गाढवे, श्री डॉ. श्याम गाढवे, श्री पवन भाऊ थोटे व संपूर्ण शहर व जिल्हा कार्यकारिणी यांनी केले. कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील चिंतामण चहांदे ,रवींद्र चव्हाण, प्रभाकर मस्के, राजेंद्र होटे ,दिलीप भाकरे ,आनंद भगत, अनिता बोकाडे, लता सवाईफुल , शाहिस्ताखान, शोभा पूनसे, प्रेमा पारिवार, नरेश पुनसे, पंकज देशमुख कृष्णा राऊत, नंदकिशोर सातारकर, धनश्री देशमुख, संजय आदोन, विष्णू पवार, पंजाब जाधव ,संगीता उंबरे, बुद्ध किरण शेंडे ,प्रणय बोंबले ,संजय राठोड, वर्षा पाडवे ,नेहा मुलुंडे, हेमंत राठोड, महेश राठोड, मिथुन राठोड, गणेश चव्हाण, असे अनेक पदाधिकारी व सभासद उपस्थित होते..
Discussion about this post