
सातारा : (अनिलकुमार कदम प्रतिनिधी )
पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असतानाच अनेकजण स्वस्तातलं पर्यायी इंधन म्हणून सौर ऊर्जेकडं पाहत आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांचीही निर्मिती होतेय. परंतु, सोलापूरच्या एका 12 वर्षांच्या चिमुकल्यानं सोलार सायकल बनवलीये. अब्दुल्ला इम्रान मंगलगिरी असं या चिमुकल्याचं नाव असून फक्त 9 हजारांत त्यानं ही सायकल तयार केलीये. विशेष म्हणजे सौर ऊर्जेवर आणि बॅटरीवर चालणारी ही सायकल बॅटरी संपल्यावर पॅडल वापरून देखील चालवता येतेय.
अब्दुल्ला इम्रान मंगलगिरी हा 12 वर्षीय विद्यार्थी सोलापुरातील पानगल शाळेत शिक्षण घेतोय. मदिना चौकात राहणाऱ्या अब्दुल्लाला वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड आहे. यातूनच त्याने सायकल आणि काही जुने साहित्य गोळा करून सोलार सायकल बनवलीये. ही सायकल बनवण्यासाठी त्याला 6 महिन्यांचा वेळ आणि 9 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. परंतु, त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला असून त्याचे सर्वत्र कौतुक होतेय..
Discussion about this post