
अकोट :
डॉ.संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी अकोट,: येथून जवळच असलेल्या रुईखेड येथे भव्य श्री. शिव महापुराण संगीतमय कथा व श्री. गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहळा शिव मंदिर संस्थान आठवडी बाजार रुईखेड येथे आयोजित करण्यात आला. दिनांक 4 मार्च पासून प्रारंभ होत असून सांगता 11मार्च ला होणार आहे. शिव महापुराण कथा प्रवक्ते श्री. परमपूज्य पंडित हितेशजी महाराज सिहोर वाले बैतुल मध्यप्रदेश यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे. या मध्ये सकाळी 5ते 6 काकडा भजन, सकाळी 9 ते 11 गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण, दुपारी 1ते 5 शिवमहापुराण सायं. 6ते 7हरिपाठ, रात्री 8 ते 10 भजन होणार आहे. गजानन विजय ग्रंथाचे पारायण व्यासपीठ नेतृत्व ह. भ. प. अंनत महाराज रोंघे, ह. भ. प. रवि महाराज मोहोड हे करणार आहेत. दि. 11 मार्च ला सकाळी गावातून कलश यात्रा निघून श्री. बागाजी महाराज भजनी मंडळ यांच्या द्वारे गोपाल काला, दहीहंडी होणार असून लगेचच भव्य महाप्रसाद होणार आहे. पंचक्रोशी तील गावकरी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. शिवभक्त मंडळ, व समस्त गावकरी मंडळी रुईखेड यांनी केले आहे..
Discussion about this post