सुजाता कोरवी कोजिम प्रेरणा पुरस्काराने गौरव
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेंद्र कदम यांच्या हस्ते सन्मान
आजरा /चंदगड : प्रतिनिधी,
खेडूत शिक्षण संस्था संचलित ज्येष्ठ अध्यापिका सौ. सुजाता कोरवी यांना कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत शैक्षणिक , सामाजिक तसेच विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्धल व उपक्रमशीलतेबद्धल सन २०२४-२५ सालाचा ‘कोजिम प्रेरणा पुरस्कार’देऊन सन्मानित करण्यात आले .
‘माहिती तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे भाषेच्या शोधाच्या शक्यता मारून टाकल्या आहेत. त्यामुळे अभिजात मराठी भाषेच्या संवर्धन, संरक्षण आणि संक्रमणाची जबाबदारी यापुढे आपल्या सर्वांवर आहे’, असे प्रतिपादन डॉ. महेंद्र कदम यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे (कोजिम) आयोजित विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राम गणेश गडकरी सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘डाएट’चे अधिव्याख्याता डॉ. तुकाराम कुंभार होते. ‘अभिजात मराठी भाषा जपण्याचे कार्य घरापासूनच झाले पाहिजे, तरच तिचा खऱ्या अर्थान प्रसार होईल’, असे मत डॉ. कुंभार यांनी
कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेंद्र कदम, ‘डायट’चे अधिव्याख्याता डॉ. तुकाराम कुंभार यांच्या हस्ते शिक्षकांना विविध पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.
‘कोजिम’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा महिला प्रतिनिधी मनीषा डांगे यांनी स्वागत केले. सुजाता कोरवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रविंद्र पाटील, बी.एन पाटील, व्ही. एल. सुतार, एच आर पाऊसकर,आनंत पाटील, मोहन पाटील, एस पी पाटील,संजय साबळे, महादेव शिवणगेकर, राजेंद्र शिवणगेकर,कमलेश कर्निक उपस्थित होते.
Discussion about this post